अभेद राहो एकता,
हा वर दे आदिके,
अमिट राहो ज्ञानता,
हा वर दे शारदे,
अभय राहो संपदा,
हा वर दे अंबिके,
अगाध राहो प्रेरणा,
हा वर दे रेणुके,
अबाध्य राहो निष्,ठता
हा वर दे तारिके,
अमोघ राहो शिष्टता,
हा वर दे मल्लिके,
अनंत नांदो सौख्यता,
हा वर दे ज्योतिके,
अटळ राहो मानवता,
हा वर दे देविके,